बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : निसर्गाच्या कोपाने सर्वत्र अवकळा पसरली असल्याने मनात दु:ख वाटते, ४३ वर्षांपासून बार्शीकरांनी सोलापूर जनता बँकेस सतत प्रेम दिले, चांगल्या व्यवसायामुळे लवकरच बार्शीत दुसरी शाखा सुरु करु होईल, असे बँकेचे संचालक जगदीश तुळजापूरकर यांनी सांगितले.
    बुधवारी दि. ५ मार्च रोजी रोजी वीरशैव लिंगायत बोर्डिंग येथे सोलापूर जनता बँकेच्या बार्शी शाखेस विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. चांगला व्यवसाय व सेवाकार्यबद्दल मुख्य शाखेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला.
    यावेळी अध्यक्षस्थानी डॉ.बी.वाय.यादव, डॉ.नाना सामनगावकर, रजनीताई जोशी, शाखा व्यवस्थापक संजय सोपल, पी.के.जोशी, कुलकर्णी, सरवदे, महेश अंदेली, डॉ.बासुतकर, धरणे सर, मुकूंदराव देवधर, सुरेश पाटील, जगन्नाथ सहस्त्रबुध्दे, ऍड्.असिफ तांबोळी, जयेश कोठारी, डॉ.माणिक सामनगावकर, डॉ.ना.पा.देशपांडे, बाबासाहेब मनगिरे, मैनुद्दीन तांबोळी, संतोष दोशी, मोहन कुलकर्णी, अच्युत कुलकर्णी, दौलतराम चांडक, तुषार भिंगार्डे, गिरीष देशपांडे, प्रशांत गायकवाड, भिमा कांबळे, सरकाळे आदी उपस्थित होते.
    तुळजापूरकर म्हणाले, लातूर पाठोपाठ बार्शी ही चांगली बाजारपेठ आहे, कर्मचार्‍यांचे चांगले काम असल्याने निरनिराळ्या बँका असल्या तरीही आपल्या शाखेचा व्यवसाय वाढत आहे, आम्हाला माणूस जपायचा आहे व त्यापध्दतीची वागणूक मिळत असल्याने खातेदार, कर्जदार, ठेवीदारांचा ओघ वाढत आहे. १३०२ कोटी ठेवी, ९०४ कोटी कर्जे, एकूण व्यवसाय २२०६ कोटींच्या जवळ पोहोचला असून नजीकच्या काळात १० जिल्ह्यांतील सर्वात मोठी बँक व शाखा असेल. बदलत्या धोरणाणुसार आणखी चांगल्या तंत्रज्ञान व सुविधा उपलब्ध करुन देण्याचा मान आहे. महाराष्ट्रातील काही ठिकाणच्या बँका बुडत असल्याचे चित्र दिसून येत असतांना चांगल्या प्रकारच्या नियोजनामुळे दिवसेंदिवस बँकेचा चांगला आलेख वाढत आहे ही गौरवाची बाब आहे. आपली बँक कधीही बुडणार नाही असा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीस ग्रामदैवत श्री भगवंत व श्री लक्ष्मी प्रतिमापूजन दिपप्रज्वलन करण्यात आले. सूत्रसंचलन सोमेश्वर घाणेगावकर यांनी केले.
 
Top