पांगरी (गणेश गोडसे) :-  पांगरी (ता. बार्शी) व परिसरात रंगाचा ऊत्सव रंगपंचमी अतिशय उत्साही वातावरणात साजरी करण्‍यात आला. तरूण- तरूणींपासुन अबाल वृदध व बालकांनीही रंगपंचमीत आनंदात सहभाग घेतला. सलग तीन वर्षे पडलेला दुष्काळ व नुकतीच झालेली गारपीठ यातुन सावरत शेतक-यांनीही रंगपंचमीचा आस्वाद घेतला. सकाळपासुनच तरूण घोळक्याने फिरूण रंगातुन हुकलेला तरूण शोधुन त्याच्यावर रंगफेक केली जात होती.
   डोक्यात अंगावर अंडी फोडुन अंगावरील कपडे फाडुन अतिशय उग्र पध्‍दतीने रंगपंचमी साजरी करून अघोरी आनंद पांगरीतील कांही भागातील तरूणांनी घेतला. सुट्टीचा दिवस असल्यामुळे लहान बालकांनी सकाळपासुनच एकमेकांच्या अंगावर रंग ऊडवुन रंगपंचमीचा आनंद घेण्‍यास सुरूवात केली होती. उन्हामुळे शरिराचा होणारा दाह कमी करण्‍यासाठी रंगपंचमी हा रंगोत्सव पुरातन काळापासुन आबालवृदधांमधुन मोठया ऊत्साहात व आनंदी वातावरणात साजरा केला जातो. मात्र अलिकडील काळात रंगाचे स्वरूप बदलुन त्यांची जागा रासायनिक रंगांनी घेतल्यामुळे रंगपंचमीच्या ऊत्सवाचा मुळ उद्देश लोप पावत चालला आहे.
    पांगरी येथील बस स्थानक चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महाजन गल्ली, भवानी चौक, गोडसे गल्ली, अचानक चौक, बाजारपेठ, इंदीरा नगर, शिक्षक कॉलनी, शिवराम नगर, श्रीरामपेठ, कारी चौक, संभाजी महाराज चौक, आण्णाभाऊ साठे नगर, भिमनगर आदी भागात तरूण-तरूणींसह अनेकांनी एकमेकांच्या अंगावर रंगाची उधळण करत रंगपंचमीचा सन साजरा केला.पांगरीत चौका चौकात एकमेकांना ओला व कोरडा रंग लावुन आनंद घेतला जात होता.
 
Top