बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकर्‍यांची प्रचंड नुकसान झाली आहे. यामध्ये फळबागा, रब्बी पिकांचे न भरुन येणारे नुकासान झाले आहे. शासनाच्या वतीने त्वरीत बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी, बिनव्याजी कर्ज मिळावे, विज बील व पीक कर्जे माफ करावी, जनावरांच्या चार्‍याचा बंदोबस्त करावा. दुबार पंचनामे करावे अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने तहसिलदार बालाजी सोमवंशी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. 
       यावेळी तालुका संयोजक अॅड्.श्रीकांत सुरवसे, सिकंदर आतार, एम.के.शेख, तालुका संघटक अनिल भोसले, बुर्‍हाण शेख, विधाते, विष्णु सातपुते, रविंद्र लोहार, रुपेश तंटक, अभय चकोर, गोरख बनसोडे आदी उपस्थित होते.
 
Top