बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच वेतन वेळेवर मिळत नसल्याने माध्यमिक शिक्षकांत तीव्र संतापाची लाट दिसून येत असल्याची माहिती महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे सहकार्यवाह एस.डी.जमाले यांनी दिली.
फेब्रुवारी २०१४ चे वेतन ऑफलाईन देण्याचे असतांनाही वेतनपथक कार्यालयाच्या दुटप्पी व लहरी धोरणाने अर्धा महिना संपत आल्यावरही वेतनाचे देयक अदा करण्यात येत नाही. वेतन दरमहा १ तारखेस नियमितपणे होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने बँकेमार्फत वेतन योजनेची आखणी केली. परंतु सोलापूर जिल्ह्यात शालार्थ वेतनप्रणालीच्या नावाखाली अनियमित वेतनामुळे शिक्षकांची पिळवणूक होत आहे. माहे फेब्रुवारीचे वेतन तातडीने मिळावे यासाठी मुख्याध्यापक संघ व सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे शिष्टमंडळ यांनी नूतन शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले व वेतनपथक प्रभारी अधिक्षक शिवाजी चंदनशिवे यांची भेटी घेतली. यावेळी फेब्रुवारी महिन्यातील वेतन देयकांत कमी पडणार्या रकमेची तरदूतर करण्यासाठी वेतन पथक कार्यालयाचे अधिकारी पुणे येथे गेल्याची माहिती मिळाली, यावर लवकर निर्णय होत नसल्याचे दिसून आलायाने आंदोलनाचा अवलंब करावा लागेल असे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे मुकूंद साळुंके, सचिन झाडबुके यांनी म्हटले. तातडीने वेतन अदा करावे अशी मागणी शिक्षकांतून होत आहे.
महागाई भत्त्याच्या फरकाने देयकाची रक्कम वाढल्याने कमी पडणार्या रकमेची तरतूद वेतन पथकाकडून करण्यात आली नाही, यामध्ये नियोजनशून्य कारभार दिसून येत आहे. चालू महिनाअखेरची प्राप्त सर्वप्रकारची वेतनदेयके, रजाबदली देयके, वैद्यकिय खर्चाची प्रतिपूर्ती देयके इ.मार्चअखेर खर्ची पडून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रक्कम मिळावी अशी मागणी सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे सल्लागार अंबादास मस्के, हरिदास जाजनुरे, नागनाथ राऊत, नीलकंठ हिंगे, धानप्पा हसरमणी, शरीफ बागवान, रमेश पवार, राजाराम शिवशरण यांनी केली आहे.