उस्मानाबाद :- जिल्ह्यात 5 मार्च ते 9 मार्च या दरम्यान अवकाळी पाऊस व गारपीटमुळे मृत पावलेल्या पशुधन 9 लाख 30 हजार रुपयांची हानी झाली आहे. यात 23 मोठी जनावरे व 1 पशुधनाचा समावेश असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, उस्मानाबाद यांनी दिली आहे.
अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे जिल्हयात एकुण 86 मोठी जनावरे, 26 लहान जनावरे, 97 शेळी व मेंढया आणि 126 कोंबड्याचा बाधीतमध्ये समावेश आहे. काही बाधीत झालेल्या जनावरांना संसर्गजन्य साथीचे आजार उदभवू नयेत म्हणून घटसर्प, लसीकरण, शेळया मेंढ्यामध्ये पीपीआर रोगाचे लसीकरण व कोंबडयांना राणीखेत व देवी रोगाची लसीकरण करण्याचे नियेाजन करण्यात आले आहे.
जिल्हास्तरावर नैसर्गिक आपत्तीची माहिती संकलीत करुन तात्काळ उपाय योजना करण्यासाठी तालुका निहाय कर्मचाऱ्याची नियुक्त्या करण्यात आले असून हे कार्यवाही शिबीर 14 मार्च रोजी उस्मानाबाद, तुळजापूर आणि परंडा 14 व मार्चला घेण्यात येणार आहे, असेही कळविण्यात आले आहे.