उस्मानाबाद :- लोकसभा निवडणुकीत 2014 करीता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस पावले उचलली  असून आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये कसल्याही प्रकाराचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरीता परंडा विधानसभा मतदार संघाअंतर्गत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या 4 व्यक्तींवर उपविभागीय अधिकारी संतोष राऊत यांनी हदृपारीची कारवाई केली आहे.
      या हद्दपार केलेल्या व्यक्तींमध्ये बाबु जालिंदर काळे, कल्याण दत्ता काळे, शंकर बालाजी ऊर्फ बल्या काळे (सर्व राहणार भूम) आणि अशोक रावसाहेब वनवे (रा. हिवरडा ता. भूम )यांचा समावेश आहे.
      चारही व्यक्तींवर यापूर्वी विविध पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येकी  10 ते 12 गुन्हे दाखल झाले असून या चारही व्यक्तींना उस्मानाबाद, सोलापूर, व बीड या तीन जिल्ह्यातून हदृपार करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी संतोष राऊत यांनी निर्गमित केले आहेत. तसेच तहसीलदार, भूम यांनी 57 व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कार्यवाही केली आहे. तहसीलदार वाशी यांनी 22 व्यक्तिंवर  तर तहसीलदार परंडा यांनी 32 व्यक्तिंवर प्रतिबंधात्मक कार्यवाही केली आहे.
      त्याचप्रमाणे अवैधपणे दारु विक्री करणा-या 19 व्यक्तीवर उपविभागीय अधिकारी यांनी मुंबई प्रोहिबिशन अॅक्ट अंतर्गत कारवाई केल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीमध्ये वचक बसला आहे.  याशिवाय प्रतिबंधात्मक कारवाई करावयाच्या अनेक व्यक्ती फरारी झाल्याने निदर्शनास आले आल्याने सदर व्यक्तींचा शोध घेवून त्यांना तात्काळ हजर करण्याविषयी पोलीस प्रशासनास आदेश देण्यात आले आहे.
          कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन यांची संयुक्त बैठक पार पडली असून परंडा विधानसभा मतदार संघाअंतर्गत येणा-या भूम, परंडा व वाशी या तालुक्यात कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांबाबत प्रशासन सतर्क राहून प्रभावी उपाययोजना हाती घेतल्या आहेत.       
 
Top