उस्मानाबाद :- जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अवेळी पाऊस व गारपीटीने  मोठ्या प्रमाणात फळपिक व शेती पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या अनुषंगाने केंद्रीय पथक उस्मानाबाद जिल्ह्यास शुक्रवार, दि. 14 मार्च रोजी भेट देणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
    हे केंद्रीय पथक  लातूरहून निघून  सकाळी 8-30 वाजता कळंब तालुक्यातील ढोराळा येथील द्राक्ष व ज्वारी पिकांची पाहणी करणार आहे. सकाळी 10 वाजता उस्मानाबाद तालुक्यातील पळसप येथे ज्वारी, गहू व हरभरा पीकांच्या नुकसानीची हे पथक माहिती घेईल. त्यानंतर सकाळी 10-50 वाजता उस्मानाबाद तालुक्यातील अरणी येथील ऊस, भाजीपाला, ज्वारी व गहू पिकांची हे पथक पाहणी करणार आहे.
    त्यानंतर हे पथक तुळजापूर येथे रवाना होईल. तेथून दु. 1-50 वाजता तुळजापूर तालुक्यातील भातंब्री या गावास भेट देवून तेथील ज्वारी तसेच पपई बागांच्या झालेल्या नुकसानीची हे पथक पाहणी करेल. तेथून पुन्हा हे पथक उस्मानाबाद येथे येईल आणि दु.3-15 वाजता उस्मानाबाद येथील पॉलीहाऊसला भेट देईल. त्यानंतर हे पथक आपला अहवाल केंद्र शासनाला सादर करणार आहे.     
 
Top