बार्शी : वैद्यकीय शाखेच्या विदयाथींनी युवा कवियत्री कु स्नेहल राजेंद्र मिरगणे यांच्या जगणयाचं पान पान या अक्षर मानवने तयार केलेल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन दि. १४ मार्च रोजी सायंकाळी ६.०० वाजता यशंवत चव्हाण संस्कृती सभागृहात होणार असल्याची माहिती अक्षर मानव संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश बुरगूटे यांनी दिली.
    स्‍नेहलचे पिता व आरएसएमस समाजसेवा संस्‍थेचे अध्‍यक्ष राजेंद्र मिरगणे यावेळी उपस्थित होते. यावेळी डॉ. बुरगूटे म्हणाले, स्‍नेहल मिरगणे ही संवेदनशील आणि चिंतनशील विचाराची विद्यार्थ्‍यांनी आहे. तिने समाजातील अनेक विसंगती विविध भावना, निसर्ग यावर सुंदर काव्‍य रचना केल्‍या आहेत. नवोदितांना व्‍यासपीठ देण्‍यासाठी अक्षर मानव संघटनेने हा काव्‍यसंग्रह प्रकाशित केला आहे. या काव्‍यसंग्रहाचे विख्‍यात चित्रपट कथा लेखक कादंबरीकार राजन खान यांच्‍या हस्‍ते होणार असून कार्यक्रमाचे अध्‍यक्षस्‍थान ज्‍येष्‍ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र दास भूषविणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्‍हणून डॉ. महेंद्र कदम, उद्योगपती रामचंद्रभाऊ सोमाणी, यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्‍यक्ष अरुण बारबोले उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्‍याचे आवाहन उद्योजक राजेंद्र मिरगणे, अक्षर मानवचे उपाध्‍यक्ष मुरलीधर चव्‍हाण, सचिन अपसिंगकर यांनी केले आहे.
 
Top