पांगरी (गणेश गोडसे) :- एकाच रात्रीत चोरटयांनी सहा घरे फोडुन लग्नाच्या बस्त्यासह सोन्याचांदीचे दागिने व रोकड व कपडे असा लाख रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना पांगरी पोलिस ठाण्याच्या हदीतील धोत्रे (ता. बार्शी) येथे घडली. घरफोडया होऊनही लोकांनी पोलिसात फिर्याद दाखल करण्‍याकडे कानाडोळा केल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. मोठया प्रमाणात घरफोडया होऊनही पांगरी पोलिस मात्र अनभिज्ञच आहेत.
    याबबत प्राप्त अधिक माहिती अशी की, धोत्रे या गावावर डोळा ठेऊन अज्ञात चोरटयांनी गावातील लोक झोपल्याची संधी साधत पाच सहा घरांमध्ये वेगवेगळया पदधतीने प्रवेश करूण घरामध्ये असलेले दोन तोळयाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम कपडे, लत्ता व एकाने जवळ लग्न आल्यामुळे घरात आणुन ठेवलेला बस्ता आदी साहित्य चोरून नेले आहे. मात्र एवढया मोठया प्रमाणात चो-यांच्या घटना घडुनही लोकांची कुणाकडेही दाद ना फिर्याद आहे. झाले गेले गंगेला मिळाले या म्हणीप्रमाणे एवढया मोठया प्रमाणात नुकसान होऊनही सर्वजण आळी मिळी गुप्प चिळळी प्रमाणे शांत राहीले आहेत. धोत्रे गावातील लांडे नावाच्या ग्रामस्थांचे 2 तोळयांचे दागिने व लग्नासाठी घरात आणुन ठेवलेला बस्ता शेख नामक व्यक्तीचे रोख 10 हजार रूपये साडया तेलाचे, डब्बे तसेच हागवणे यांचे रोख 5000 रूपये व कपडे असे साहित्य चोरून नेण्‍यात आल्याचे वृत आहे.
   आमच्या चो-या होऊन ऐवज जावुनही फिर्याद दिल्यानंतर पुन्हा तपासासाठी आमच्याकडेच पैशाची मागणी करण्‍यात येत असल्यामुळे आम्ही तक्रार दाखल करण्‍याचे टाळतो असे यापुर्वी चोरीच्या घटनांचा अनुभव घेतलेल्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबत पांगरी पोलिसांकडे चौकशी केली असता अद्याप कोणीही तक्रार दाखल करण्‍यास आमच्याकडे आले नसल्याचे व याबाबत आपणास कांही कल्पना नसल्याचे बोलताना सांगितले.
 
Top