बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: बार्शी तालुक्यातील १३७ गावांच्या ३०९ मतदानकेंद्रापैकी शहरातील ५ संवेदनशील याचप्रमाणे इतरही ठिकाणी चांगला बंदोबस्त देण्यात येणार आहे. संवेदनशील, अतीसंवेदनशील आणि शांततेत पार पडणार्या मतदानकेंद्राचे सुरक्षेच्या दृष्टीने विविध टप्पे करण्यात आले असून मतदारांवर प्रभाव, गुंडगिरी प्रवृत्तीच्या व्यक्तींबाबत कारवाई सुरु असल्याचे पोलिस उपाधिक्षक रोहिदास पवार यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगीतले.
अतिसंवेदनशील ठिकाणी इनकॅमेरा मतदान होईल, पदयात्र, सभा इत्यादींसाठी तहसिल कार्यालयात विविध प्रकारच्या परवानगीसाठी कक्ष तया आहेत, तालुक्यात यावर्षी ७ मतदानकेंद्रांची वाढ झाली आहे. विविध गुन्ह्यातील संशयीत व्यक्तिंबाबत फौजदारी संहितेप्रमाणे कारवाई करण्यात येईल. दोनपेक्षा जास्त गुन्हे असलेल्या गुंडगिरी प्रवृत्तींच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक व इतर कारवाई करण्यात येईल. काहींना या काळात ताब्यात घेण्यात येईल. शासकिय कर्मचार्यांसाठी स्वतंत्र पोस्टल मतदानाची सोय, बेकायदा दारु विक्री करणारांवर नियमितपणे कारवाई सुरु आहे. हद्दपार करावे लागणार्या गुंडांची यादी व प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. विविध गुन्ह्यातील फरारी आरोपींची यादी तयार करण्यात आली आहे त्यांचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली आहेत. वाहनतपासणी व नाकाबंदी करण्यात येत आहे. २० जवानांचे दंगा काबू पथक, व्हिडीओ चित्रीकरणाची सोय, शस्त्र परवाने असलेल्या व्यक्तींकडील ज्यांचे आवश्यक असेल त्यांचे शस्त्र ताब्यात घेणे, मतदानासाठी लालच दाखविणे, पैसे वाटप करणे इत्यादी प्रकारांवर आळा घालण्यासाठी पथक, जास्त मतदान होणारे मतदान केंद्र, आचारसंहितेच्या विविध परवानगी इत्यादी प्रकारे व गरजेनुसार मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक विभागाशी आवश्यक त्या मदतीस पोलिस यंत्रणा सज्ज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.