उस्मानाबाद :- शेतक-यांवर नैसर्गिक आपत्ती आली असताना गावपातळीवरील शासकीय कर्मचा-यांनी तात्काळ त्यांच्या नुकसानीबाबत पंचनामे केले पाहिजेत. आवश्यक ती सर्व मदत त्यांना मिळेल आणि प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, हे त्यांना जाणवले पाहिजे. त्यादृष्टीने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले.
येथील जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात गारपीटीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीसंदर्भात डॉ. नारनवरे यांनी आढावा घेतला. अपर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी संचालक डॉ. केशव सांगळे, कृषी विकास अधिकारी मदनलाल मिनीयार आदींची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी सर्व नायब तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी आदींची तातडीची बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.
जिल्ह्यात 27 फेब्रुवारीपासून झालेल्या गारपीटीने प्रचंड नुकसान झाले आहे. या संकटाच्या काळात शेतक-यांच्या मदतीला धावून जाणे ही आपली कायदेशीर जबाबदारी आहे. अशावेळी गारपीटग्रस्त शेतक-यांना धीर देणे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. आपत्तीवेळी प्रशासन हे सामान्य जनतेसाठी काम करते, हे कृतीतून दिसले पाहिजे. ती आपली सर्वांची जबाबदारी आहे. अशावेळी हयगय करणा-या कर्मचा-यांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.
कोणत्याही परिस्थितीत वस्तुनिष्ठ पंचनामे झाले पाहिजेत. कोणत्याही दबावाशिवाय झालेल्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे आला पाहिजे. नुकसानग्रस्त शेतक-यांना प्रशासनाकडून जे जे सहकार्य करता येईल, ते तात्काळ करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी तोटावार यांनी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे सांगितले.