नळदुर्ग : काळेगाव (ता. तुळजापूर) येथील जि.प. शाळेमध्ये इयत्ता दुसरीत शिकणा-या एका विद्यार्थिनीस शिक्षकाने बेदम मारहाण केल्याने सदरील विद्यार्थिनी जखमी झाली असून याप्रकरणी आरोपी शिक्षकांविरुध्द पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या शिक्षकास अटक करुन न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने 'गुरुजीस' एक दिवसाची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.
कु. मोहिनी पांडुरंग साखरे (वय 7 वर्ष, रा. काळेगाव, ता. तुळजापूर) असे मारहाण केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. तर ज्ञानेश्वर ढोले असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. तुळजापूर तालुक्यातील काळेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक ज्ञानेश्वर ढोले यांनी दुसरीतील विद्यार्थिनी मोहिनी साखरे हिला सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सरावादरम्यान चांगले नृत्य करता न आल्याने मारहाण करण्यात आली होती. गुरुवार रोजी याप्रकरणी मोहिनीचे वडील पांडुरंग साखरे यांनी शिक्षकाविरुद्ध अँट्रॉसिटी व बालसंरक्षण कायद्यांतर्गत नळदुर्ग पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. शिक्षक ढोले यांना न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.