जळकोट (संजय रेणुके) :- नळदुर्ग, जळकोट व अणदूर ही तुळजापूर तालुक्‍यातील तीन शहरे राष्‍ट्रीय महामार्ग क्रमांक नऊवर असून या महामार्गावर सतत अपघात होतात. यापूर्वी तर गत दोन वर्षापूर्वी जळकोटजवळ खासगी बस अपघातात तब्‍बत 29 जणांचा जागीच मृत्‍यू झाला होता. मात्र जळकोट, नळदुर्ग व अणदूर येथून अत्‍याधुनिक उपचार मिळण्‍याचे ठिकाण म्‍हणजे उमरगा व सोलापूर हे पन्‍नास किलोमीटरच्‍या अंतरावर असल्‍याने अपघातातील जखमींना उपचारार्थ सदर ठिकाणी घेऊन जात असताना खूपच वेळ जात असल्‍याने गंभीर रुग्‍णांना तात्‍काळ उपचाराअभावी आपले प्राण गमवावे लाले आहेत. त्‍यामुळे अपघातातील रुग्‍णांना तात्‍काळ उपचार मिळनू त्‍यांचे प्राण वाचावेत, यासाठी नळदुर्ग येथे शंभर खाटांचे ग्रामीण रुग्‍णालय दोन वर्षापूर्वी मजूर झाले होते. मात्र त्‍याचा ठाव ठिकाणा अद्यापही कोठे दिसत आहे.
    सदर रुग्‍णालय उभे होईपर्यंत आणखीन किती अपघातग्रस्‍तांना आपले प्राण गमवावे लागतील, हे भविष्‍य काळच ठरवेल. रुग्‍णांचे वाचवायचे असतील तर सदर रुग्‍णालय तात्‍काळ उभे करण्‍यासाठी पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष घालावे, अशी मागणी परिसरातील जनतेतून होत आहे.
 
Top