नळदुर्ग -: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जि.प.प्रा.शाळा वागदरी (ता. तुळजापूर) येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
वागदरी येथील जि.प.प्रा.शाळा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीच्यावतीने डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या 200 मीटर धावणे, निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. सर्व स्पर्धेचे उदघाटन सहशिक्षक भैरवनाथ कानडे यांच्या अध्यक्षतेखाली तर दयानंद काळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्याध्यापक प्रकाश मोकाशे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांचे पुस्तक वाचन हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य एस.के. गायकवाड, संतोष झेंडारे, सहशिक्षक गोविंद जाधव, युवराज जाधव, विकास कुलकर्णी, आर.डी. चव्हाण, एम.आर. जते मॅडम, वाघमारे संजय, गणपत सुरवसे आदीजण उपस्थित होते.
येथील भिमनगर येथे डॉ. आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने समाज मंदिरासमोर वागदरी ग्रामपंचायतीचे सरपंच राजकुमार पवार यांच्या हस्ते डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करुन ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रिपाइंचे तुळजापूर तालुकाध्यक्ष एस.के. गायकवाड यांनी केले.
यावेळी माजी सरपंच नागनाथ बनसोडे, राजकुमार गोगावे, मल्लिनाथ धुमाळ, सोमा वाघमारे, जयंती उत्सव कमिटीचे हणुमंत वाघमारे, अाण्णासाहेब वाघमारे, बाबासाहेब वाघमारे, मोहन वाघमारे, ग्रा.प. सदस्या कविता गायकवाड, रावसाहेब वाघमारे, संतोष झेंडारे, अनिल वाघमारे, महादेव वाघमारे, चंद्रकांत वाघमारे सह महिला व युवा कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते.