जळकोट : तुळजापुर तालुक्यातील जळकोट परिसरात टँक्टर उलटुन झालेल्या अपघातातील मृतांची संख्या तिनवर गेली असून कालच्या जखमीपैकी आणखी एकाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.
याबाबत सविस्तर माहीती अशी की, तुळजापुर तालुक्यातील हंगरगा (नळ) येथे दि. १८ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मजुरांचा ट्रक्टर उलटुन अपघात झाला होता. या अपघातात दोघेजण जागीच ठार झाले होते. तर १८ जण जखमी झाले होते. जखमीपैकी रेश्मा नबी शेख (वय-३०) या महीलेचा उपचारादरम्यान त्याच दिवशी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास मृत्यु झाला असून आता अपघातामधील मृतांची संख्या तिन झाली आहे. अपघातामधील उर्वरीत १७ जखमींवर सोलापुर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.