![]() |
जिल्हाधिकारी |
उस्मानाबाद :- आदर्श आचारसंहितेची यशस्वी अंमलबजावणी करत आणि विविध कक्षांच्या माध्यमातून समन्वयाने काम करत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यात निवडणूक यंत्रणेने महत्वाची भूमिका बजावली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने सर्वच बाबी समर्थपणे हाताळल्याने निवडणूकीतील मतदान प्रक्रियेचा महत्वाचा टप्पा शांततेत पार पडला. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी व उमेदवारांनी आचारसंहिता पालनात बजावलेली सकारात्मक भूमिका, प्रशासनाच्या प्रयत्नांना प्रसारमाध्यमांनी दिलेले बळ यामुळे ही निवडणूक खऱ्या अर्थाने वेगळी ठरली.
विविध यंत्रणांच्या माध्यमातून अदयावत माहिती गोळा करणे, माहिती तंत्रज्ञानाचा चांगला वापर, मतदार जनजागृतीसाठी केलेल्या प्रयत्नांना मिळालेले यश ही या निवडणूकांची वैशिष्ट्ये ठरली. किरकोळ स्वरुपाच्या तक्रारी वगळता जिल्ह्यात सर्वत्र शांततापूर्ण व सुरळीतपणे ही प्रक्रिया पार पडली.
लोकसभा निवडणूकीसाठी 5 मार्च रोजी आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नारनवरे यांनी प्रशासकीय यंत्रणा गतीमान केली. अपर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रभोदय मुळे यांचा समन्वय आणि त्यांनी निवडणूक प्रक्रियेशी संबधित प्रत्येक बाबतीत जाणीवपूर्वक लक्ष देवून केलेले नियोजन याची फलश्रृती मतदानाची टक्केवारी वाढण्यात आणि शांततापूर्ण वातावरणात झालेल्या मतदान प्रक्रियेत पाहायला मिळाली.
निवडणूक प्रक्रियेशी निगडीत प्रत्येक बाबीनिहाय कक्षांची स्थापना करुन त्याठिकाणी कक्ष प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे तालुका, गावपातळीवरील विविध यंत्रणांशी संपर्क साधून माहिती मिळविणे सहज सोपे झाले. मतदान कर्मचारी व्यवस्थापन कक्ष, ईव्हीएम, वाहन व्यवस्था व वाहन परवाना कक्ष, अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षण कक्ष, निवडणूक साहित्य मागणी व वितरण, आचारसंहिता कक्ष, उमेदवार-राजकीय पक्ष यांचे निवडणूक संबधित खर्च व त्यावर नियंत्रण, निवडणूक निरीक्षक कक्ष, कायदा-सुव्यवस्था व सुरक्षा व्यवस्था, तसेच जिल्हा सुरक्षा नियोजन कक्ष, नमुना मतपत्रिका/ टपाली मतपत्रिका छपाई व वितरण करणे, मीडिया कक्ष, संगणक कक्ष, स्वीप कक्ष, मदत व तक्रार निवारण केंद्र, एसएमएस मॉनिटरींग व संदेश-संपर्क कक्ष, सनियंत्रण कक्ष, सांख्यिकी, छायाचित्रण, व्हिडिओ सर्वेक्षण कक्ष, निवडणूक विषयक अहवाल व सूचना संकलन व वितरण कक्ष, वैदयकिय मदत कक्ष, सहायक खर्च निरीक्षक अशा कक्षांच्या माध्यमातून या प्रक्रियेशी संबंधित कामे पार पाडली गेली.
विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी कक्ष प्रमुख म्हणून काम करताना ही जबाबदारी अत्यंत गांभीर्याने पार पाडली. संबंधित कक्षात नियुक्त सहायक अधिकारी-कर्मचारी यांनीही निवडणूक कामांचे गांभीर्य ओळखून काम केल्याने जिल्हा निवडणूक प्रशासनाने निवडणूक कालावधीतील परिस्थिती अतिशय संयमाने आणि आत्मविश्वासाने हाताळली.
लोकसभा मतदार संघातील औसा, उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद, बार्शी, परंडा या सहाही मतदारसंघाच्या सहायक निवडणूक अधिकारी आणि तेथे नियुक्त विविध विभागांच्या अधिकारी-कर्मचारी यांनी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली.
या निवडणूकीत जिल्हा निवडणूक यंत्रणेने राबविलेली इलेक्ट्रॉनिक मॅनिटरींग सिस्टीम समन्वयासाठी अतियश उपयुक्त ठरली. जिल्ह्याच्या कोणत्याही भागातील निवडणूक विषयक माहिती तात्काळ घेणे यामुळे सोपे झाले.
कायदा व सुव्यवस्था हा घटकही महत्वाचा ठरला. जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस दलाने जिल्ह्यात शांततापूर्ण वातावरण ठेवण्यात चांगली भूमीका बजावली.
जिल्हाधिकारी डॉ नारनवरे यांनी वरिष्ठ अधिका-यांना सोबत घेवून केलेले नियेाजन, त्या नियोजनाची गावपातळीपर्यत काटेकोरपणे झालेली अंमलबजावणी यामुळे निवडणूक मतदान प्रक्रीया सुरळीत पार पडण्यात निवडणूक यंत्रणेचे यश उठून दिसले.