उस्मानाबाद :- 19 जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबादच्यावतीने जिल्हयातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी महा लोकअदालत जिल्हा न्यायालयात नुकतेच आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा न्यायाधिश सुरेंद्र तावडे हे होते. प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष आर. एस. लोमटे, जिल्हा सरकारी वकील व्हि. बी. शिंदे, उपजिल्हाधिकारी बी. एस. चाकुरकर, विमा कंपनी अधिकारी, बँक अधिकारी, विधीज्ञ, न्यायीक अधिकारी उपस्थित होते
याप्रसंगी भूसंपादन, विमा कंपन्या, बँका यांनी जास्तीत जास्त प्रकरणे सामोपचाराने मिटवून घेणे आवश्यक असल्याने सर्व संबंधित पक्षकारांनी सामंजस्याने त्यांची प्रकरणे तडजोडीने मिटवून घ्यावीत आणि आपला वेळ, पैसा वाचवून त्याचा सदूपयोग करावा,असे आवाहन यावेळील प्रमुख वक्त्यांनी केले.
पहिल्या टप्यात जिल्ह्यातून मोटार अपघात /कामगार नुकसान भरपाईचे 33 प्रकरणे निकाली काढून त्यापोटी एक कोटी 34 लाख 19 हजार रुपयाची भरपाई देण्यात आली . दिवाणी 457, कौटुंबिक 19, फौजदारी 75 तर एन आय अॅक्टच्या कलम 138 अंतर्गत धनादेशाची 108 प्रकरणे सामोपचारांने मिटविण्यात आली. वाटपुर्व प्रकरणात बीएसएनएलची 6 प्रकरणे मिटवली असून 37089 तर बॅकेची 154 प्रकरणे मिटवून न रुपये 4 लाख 88 हजार 181 एवढया रक्ममेची वसूली करण्यात आली अशी माहिती यावेळी देण्यात आली.