उस्मानाबाद :- सन 2013-14 या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता  शिबीराचे येथील श्रीपतराव भोसले हायस्कुल मध्ये तालुकानिहाय सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत आयोजित करण्यात आली असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, वैजिनाथ खांडके यांनी दिली.
    रविवार, दि. 20 एप्रिल रोजी लोहारा व परंडा तालुक्याचे संच मान्यता शिबीर, 21 रोजी कळंब तालुक्याचे संच मान्यता शिबीर, 23 रोजी तुळजापूर, 24 रोजी उस्मानाबाद आणि 25 एप्रिल रोजी उमरगा तालुक्याचे संच मान्यतेचे प्रस्ताव या शिबीरात स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
संच मान्यतेसाठी शैक्षणिक 2012-13  चे शिक्षक हजेरी पत्रक, सप्टेंबर 2012 च्या सर्व वर्गाच्या तुकड्याची विद्यार्थी हजेरी पत्रक, शैक्षणिक वर्ष 2012-13 च्या संच मान्यतेची प्रत, शैक्षणिक वर्ष 2013-14 चे शिक्षक हजेरीपत्रक, सप्टेंबर 2013 च्या सर्व वर्गाच्या तुकड्यांची विद्यार्थी हजेरीपत्रक, सन 2013-14 युडायसची प्रत तसेच संच मान्यतेचे ऑनलाईन सॉफटवेअर दिनांक 25 एप्रिल रोजी सायंकाळी  5 वाजेपर्यत चालू राहणार आहे. नियोजित दिनांकास संपुर्ण कागदपत्रासह उपस्थित राहून आपल्या शाळेची संच मान्यता करुन घ्यावी.
    संच मान्यता न झाल्यास शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबधित मुख्याध्यापकावर राहील, याची संबंधितानी नोंद घ्यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (मा). जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top