पुणे -: संताजी प्रतिष्ठान, कोथरुडच्यावतीने रविवार दि. 20 मे रोजी मोफत राज्यस्तरीय तेली समाज वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळावा सृष्टी गार्डन, म्हात्रे पूल, एरंडवणे, पुणे येथे होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष रत्नाकर दळवी यांनी दिली.
दळवी म्हणाले, कोणतीही फी न घेता या मेळाव्याचे आयोजन केले अाहे. तरी वधू-वर पुस्तिकेसाठी तेली समाज बांधवांनी मुला-मुलींच पासपोर्ट आकाराच्या फोटोपसह अर्ज 10 मे पर्यंत santajipratishthan2014@gmail.com या ईमेलवर पाठवावे. माहितीसाठी संस्थेचे सचिव रत्नाकर दळवी (मो. 9922513727), संघटक रमेश भोज (9604767068) यांच्याशी संपर्क साधावा. या संधीचा समाजातील विवाहेच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.