सोलापूर -: विविध शासकीय विभागांकडून विकास कामांसाठी निधी खर्च होण्याबरोबरच त्याचे परिणाम दिसले पाहिजेत. लोकांची कामे वेळेवर व्यवस्थित करुन सुप्रशासनासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन राज्याचे मुख्य सचिव जे.एस. सहारिया यांनी केले.
सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विविध विभागांच्या अधिका-यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त प्रदीप रासकर, पोलीस अधीक्षक मकरंद रानडे, जि.प.चे मुख्य अधिकारी कार्यकारी श्रीमती श्वेता सिंघल, मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार, अप्पर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना श्री. सहारिया म्हणाले की, लोकांची कामे वेळेवर व व्यवस्थित झाली पाहिजेत. कामे प्रलंबित राहू नयेत यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. याबाबतचा सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी व प्रमुख अधिका-यांचा दर आठवड्याला आढावा घेतला जाणार आहे. यामध्ये कोणत्या जिल्ह्याने चांगले काम केले आहे याचे रेकॉर्ड केले जाणार आहे. त्यामुळे लोकांची कामे जास्तीत जास्त चांगली कशी होतील याकडे भर देण्याचे आवाहन केले.
या बैठकीत सहारिया यांनी जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतक-यांना मदतीसाठी शासनाने निर्णय घेवून निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्याचे शेतक-यांना त्वरित वाटप करण्याच्या सूचना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिका-यांना दिल्या.
या बैठकीत कृषी विभागाच्या ठिबक सिंचन व शेततळ्यांच्या कामाचा आढावा घेतला. तसेच जलसंधारण, सिमेंट बंधारा, साठवण, तलाव, पाझर तलाव, महावितरण, नगरपालिका प्रशासनाच्या कामाचा सविस्तर आढावा घेवून प्रभावीपणे कामकाजाबाबत मार्गदर्शन केले. तसेच सामाजिक वनीकरणाच्या कामाचा आढावा घेवून प्रत्येक तालुक्यात 'मॉडेल नर्सरी ' करावी अशा सूचना दिल्या. त्याचप्रमाणे वनविभागाच्या माळढोक अभयारण्याबाबत सविस्तर माहिती घेतली. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधण्यात येत असलेल्या विविध शासकीय इमारतीबाबतची व नविन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नविन इमारत बांधकामाच्या कामाबाबतचा आढावा घेतला.
तसेच विविध विभागांच्या राज्यस्तरावर शासनाच्या विविध विभागांकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नाबाबत माहिती जाणून घेवून याकडे लक्ष घातले जाईल असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांनी महसूल विभागांच्या वतीने खंडकरी शेतक-यांना अथवा त्यांच्या वारसांना जमिन वाटपाबाबत तसेच इतर विविध योजनांच्या कामाचा आढावा सादर केला तर मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती श्वेता सिंघल यांनी जि.प.च्या कामाचा आढावा सादर करुन ई - जिल्ह्यासाठी करण्यात येत असलेल्या नियोजनाबाबतची माहिती दिली.
या बैठकीला जि.प.चे अति.मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी गुरव, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, विविध वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.