पांगरी (गणेश गोडसे) :- अज्ञात कारणावरून एका एकोणीस वर्षीय नवविवाहीतेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बावी आगलावी (ता.बार्शी) येथे घडली.
पल्लवी गणेश आगलावे (वय 19, रा.बावी) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विवाहीतेचे नांव आहे. बार्शी येथील जगदाळेमामा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.देशमुख यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या खबरीत म्हटले आहे की, मयत पल्लवी आगलावे या महिलेने बावी येथील घरी पत्र्याखालील आडुला साडीच्या सहाय्याने अज्ञात कारणावरुन गळफास घेऊन आत्महत्या केली. चिखर्डे (ता. बार्शी) येथील बाबुराव ननवरे यांची मुलगी पल्लवी ननवरे याचा विवाह 27 मे 2013 म्हणजे फक्त अकरा महिन्यांपुर्वीच बावी येथील गणेश आगलावे यांच्याबरोबर झाले होते. अकरा महिन्यांपुर्वी लग्नबंधनात अडकलेल्या पल्लवीने गळफास घेऊन आत्महत्या करून जीवनयात्रा संपवल्यामुळे आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली याबाबत चर्चेला उधान आले आहे. डॉ.देशमुख यांच्या खबरीवरून पांगरी पोलिसात आकस्मात मयत म्हणुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.