उस्मानाबाद :- उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2014 अनुषंगाने शिवसेना उमेदवार प्रा. रवींद्र गायकवाड यांच्या प्रचारार्थ उमरगा  पोलीस स्टेशनच्या हदीत मौ. बलसूर येथे आयोजित सभेत गोंधळ घालून सभेचे चित्रीकरण करणाऱ्या कॅमेरामनच्या कॅमे-याचे नुकसान केल्याप्रकरणी शिवसेना कार्यकर्ते सुरेश गणपतराव मुर्टे, रा. बलसुर आणि अन्य 4 ते 5 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
       मुर्टे यांना प्रचार सभेची परवानगी दिली होती. सभा शांततेत व कोणत्याही गोंधळाविना पार पाडण्याची जबाबदारी त्यांची असतानाही या अटीचा भंग केल्याप्रकरणी पंचायत समितीचे, उमरगाचे  गटविकास अधिकारी तथा उमरगा आचारसंहिता पथक प्रमुख बबन भानुदास खंडागळे यांनी पोलीस स्टेशन, उमरगा येथे फिर्याद दिली असून संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
 
Top