उस्मानाबाद :- 40-उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2014 अनुषंगाने  अपक्ष उमेदवार रोहन देशमुख यांच्या प्रचारार्थ उमरगा शहरात  वाहन उभे करुन लाऊडस्पीकर वरुन प्रचार करण्याची परवानगी दिली असताना त्याचे उल्लंघन करुन पोलीस चालत्या वाहनामध्ये रस्त्यावर लाऊडस्पीकरमार्फत प्रचार करुन आदर्श  आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी वाहन क्रमांक एमएच-02-वायए-3246 या वाहनाच्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी  उमरगा नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी तथा आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी पथक प्रमुख संतोष टेंगले यांनी  फिर्याद दाखल केली होती. दिल्याने वाहन चालक व वाहनाविरुध्द पोलीस स्टेशन, उमरगा  येथे  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    

जमावबंदी आदेशाचा भंग आणि विनापरवाना प्रचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखलउस्मानाबाद :- उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2014 अनुषंगाने  लोहारा  पोलीस स्टेशनच्या हदीत मौ. सालेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते दयानंद महादेव गिरी, रा. लोहारा, शत्रुघ्न साळुंके, गोविंद तात्या साळुंके व गोविंद बिराजदार सर्व रा. सालेगाव (ता. लोहारा) यांनी विनापरवाना प्रचाराकरीता 10 ते 15 वाहने वापरुन प्रचार केल्याप्रकरणी तसेच विनापरवाना पदयात्रा काढल्याप्रकरणी  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पंचायत समिती लोहाराचे प्रभारी गटविकास अधिकारी, तथा आदर्श आचारसंहिता पथकाचे अर्जुन भानुदास शिंदे यांनी पोलीस स्टेशन, लोहारा येथे फिर्याद दाखल केली होती.        
 
Top