वर्धा : वर्धा लोकसभा मतदार संघाचे कॉंग्रेसचे उमेदवार सागर मेघे यांच्या गाडीतून सुमारे पावणे पाच लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
याप्रकरणी दत्तापूर पोलिस ठाण्यात कॉंग्रेसचे उमेदवार सागर मेघेंसह चार जणांवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गाडी ही अमरावतीतील धामणगावचे कॉंग्रेस तालुकाध्यक्ष मोहन सिंघवी यांची आहे. त्यामुळे पोलिसांनी मोहन सिंघवी, प्रशांत घनतेवार, राज पुरोहित यांना ताब्यात घेऊन जामिनावर सोडूनही देण्यात आले आहे. दरम्यान उमेदवार सागर मेघे हे काँग्रेसचे खासदार दत्ता मेघे सुपुत्र असल्याने पोलिसांवर चांगलाच दबाव असल्याचे बोलले जाते. तर पोलिसांनी रोख रक्कमेचे फोटो घेण्यास व कॅमेरासमोर बोलायला स्पष्ट नकार दिला.