कल्‍याणी कुलकर्णी
बार्शी (मल्लिकार्जून धारुकर) -: गुरुकुल बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्या वतीने घेण्यात आलेल्या एम.टी.एस. परीक्षेत बार्शी शहरातील कल्याणी निलकंठ कुलकर्णी या विद्यार्थीनीने ३०० पैकी २३८ गुण मिळवून केंद्रात सहावे स्थान मिळविले आहे.
    कल्याणी कुलकर्णी हि सुलाखे हायस्कूलची विद्यार्थीनी असून इयत्ता ६ वीमध्ये शिक्षण घेत आहे. प्रमोद पाटील, विद्या पाटील, गीतांजली कुलकर्णी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे.
    कल्याणी ही बार्शी वकिल संघाचे सचिव ऍड्.निलकंठ कुलकर्णी यांची मुलगी असून अध्यक्ष अॅड्.प्रविण करंजकर, उपाध्यक्ष ऍड्.महेश जगताप यांनी तिचे अभिनंदन केले.
 
Top