बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: मयत कर्जदाराच्या शेतजमीनीची बनावट दस्तावेज तयार करुन परस्पर विक्री करुन फसवणूक केल्याप्रकरणी महारुद्र आणि अनिरुध्द विष्णु जाधव यांच्या विरोधात बार्शी पोलिसांत फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महारुद्र यास सहा दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. पोलिस कोठडीनंतर न्यायदंडाधिकारी व्ही.बी.मुल्ला यांनी जामीन फेटाळला आहे.
सदरच्या फिर्यादीत भिका नरसु वाणी हे कर्जदार दि.१३ जून २०१३ रोजी मयत झाले आहेत. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी राजामती, गणेश व दिनेश अशी दोन मुले, चार बहिणी आशा मांजरे, मंदा बारंगुळे, आवडा गोडगे, इंदुरामा चोबे तसेच बसंती, जयप्रकाश, संगीता व सुनिल भराडिया हे इतर हक्कदार आहेत. मयत भिका वाणी यांनी २१ फेब्रुवारी २००५ मध्ये गट नं.१०६७/१ ही शेतजमीन नजरगहाणख करुन ३० हजार रुपये कर्ज घेतले होते. सदरच्या जागेवर कर्ज असतांना दुसरी शेतजमीन गट नं १२६७ याचा बनावट कागदपत्रांच्या आधारे दि.९ ऑक्टोबर २०१३ रोजी लिलाव करुन विक्री केली .
या प्रकरणातील आरोपीने ७/१२ चा उतारा बनावट तयार केला. यचवेळी तलाठी माढा येथे नेमणूकीस होते. त्यांच्या परस्पर हा उतारा तयार करुन भिका वाणी हे जिवंत असल्याचे भासवून दस्त नोंदणी करण्यात आली. हे प्रकरण गंभीर असून न्यायालयाने जामीन देऊ नये अशी मागणी सरकारी वकील उज्वला बळे यांनी केली. सदरची घटना दि.२४ ऑक्टोबर २०१३ रोजी नवीन ७/१२ उतारा काढल्यावर वाणी यांच्या लक्षात आली. बनावट कागदपत्रे तयार करुन परस्पर विक्री केल्याप्रकरणी महारुद्र व अनिरुद्ध जाधव या दोघाजणांविरुध्द बार्शी पोलिसांत फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला असून एकास अटक करण्यात आली आहे. यातील आरोपी जाधवचे वकिल ऍड्.विकास जाधव व सरकारी वकिल यांचे युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला. सदरच्या घटनेचा पुढील पोलिस तपास पो. उपनिरीक्षक पंकज निकम, विश्वास शिनगारे हे करीत आहेत.