पांगरी (गणेश गोडसे) -: बार्शी तालुक्‍यातील पांगरीसह सोलापुर, उस्मानाबाद, नाशिक जिल्हयातील द्राक्ष बागायतदारांना लाखो रूपयांना टोपी घालुन पलायण केलेल्या परराज्यातील व्यापा-यांचे धागेदोरे पांगरी पोलिसांच्या हाती लागले असुन भुम(जि.उस्मानाबाद) तालुक्यातुन आज गुरुवार रोजी पहाटे दोन संशयीतांसह द्राक्ष वाहतुकीत सहभाग असलेली वाहने ताब्यात घेण्‍यात आले आहे. भुम तालुक्यातील नळ वडगांव व गणेगांव येथुन एम.एच.25.3033 या गुन्हयात वापरण्‍यात आलेल्या वाहनासह या दोघांना ताब्यात घेण्‍यात आले आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य दोन आरोपी धोंडिराम अंकुश बिराजदार (वाशी, मुंबर्इ) व ओमविर (रा. सुरत, गुजरात) हे दोन मुख्य आरोपी अद्याप फरारच आहेत. दोन संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर पांगरी पोलिसांचे पथक सुरतेच्या लुटारूंना ताब्यात घेन्यासाठी आज रवाना झाले आहे.यामुळे शेतकरी फसवणुक प्रकरण उजेडाट येण्‍याची शक्यता निर्माण झाली आहे.
    याबाबत अधिक माहिती अशी की, डिसेंबर 2013 पासुन मार्च 2014 या चार महिन्याच्या कालावधीत सुरत व आग्रा येथील व्‍यापा-यानी राज्यातील असंख्य द्राक्ष उत्पादक शेतक-यांचे द्राक्षे घेऊन जावुन पैसै न देता पलायण करत लाखो रूपयांची फसवणुक केली होती. अखेर पांगरी भागातील शेतक-यांनी पोलिसात झालेल्या फसवणुकीच्या प्रकाराबाबत फसवणुक केलेल्या परराज्यातील व स्थानिक व्यापा-यांविरूदध फसवणुक केल्याप्रकरणीचा गुन्हा दाखल केला होता. पांगरी पोलिसात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत भुम तालुक्यातील दोघा संशयीतांना वाहनासह ताब्यात घेतले आहे. फसवणुक प्रकरणात महत्वाची भुमिका असलेल्या दोघांना ताब्यात घेण्‍यात आल्यामुळे या प्रकरणाचे गुढ उकलण्‍यास मोठी मदत होणार आहे. ताब्यात घेण्‍यात आलेल्यांना संबंधीत मुंबई व परराज्यातील त्या भामटया व्यापा-यासंदर्भात इत्यंभुत माहिती असल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतक-यांनी सुस्कारा सोडला आहे.
     सुरत व आग्रा येथील व्यापा-यांनी गत चार महिन्यांपासुन महाराष्ट्रातील विविध जिल्हयात अनेक शेतक-यांना लाखो रूपयांना टोपी घातली आहे. वेगवेगळया ठिकाणी गेल्यानंतर तेथील स्थानिक दलालांना विश्‍वासात घेऊन व जादा कमिशनचे आमिष दाखवुन त्यांना आपलेसे करुन त्यांच्यामार्फत व कधी शेतक-यांशी सरळ व्यवहार करून त्यांचे द्राक्षे तोडुन नेण्‍यात आले. मात्र पैसै न देतातच या व्यापा-यांनी राज्यातील द्राक्ष उत्पादकांना गंडा घालुन पलायण केले आहे. सुरतेच्या विराने अतिशय नियोजनबध्‍द व एकाच पध्‍दतीने शेतक-यांची फसवणुक केली आहे. पथक सुरतच्या दिशेने रवाना झाले असुन लवकरच या फसवणुक प्रकरणाचा छडा लागण्‍याची आशा निर्माण झाली आहे. संशयीतांना ताब्यात घेण्‍यात आल्यामुळे फसवणुकीत बळी ठरलेल्या शेतक-यांना आशेचा किरण दिसु लागला आहे. रवाना झालेल्या पथकास यश मिळुन आरोपी मिळुन आल्यास राज्यात झालेल्या द्राक्ष उत्पादकांच्या फसवणुकीची अनेक प्रकरणे निकालात निघण्‍याची शक्यता आहे. पांगरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक होवाळ सुनिल, दत्त बनसोडे, प्रसाद औटी, विनायक सुर्यवंशी यांच्या पथकांने ही कामगिरी केली.
 
Top