कळंब : तालुक्यातील डिकसळ येथील श्री संत बोधले महाराज प्राथमिक  विध्यामंदीर शाळेतील  इयत्ता सातवीच्या विदयार्थ्यांना काल निरोप देण्यात आला.
    यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते आश्रुबा गायकवाड  हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी संजीव बागल, मनसेचे कळंब तालुकाध्यक्ष बाळासाहेब कोठावळे व पालक बबन तनपुरे हे उपस्थित होते. यावेळी शाळेतील विध्यार्थी कु. प्रांजली  कोठावळे, प्रणिता गायकवाड, मदन भांडे, शाहिद पठाण अशोक अंबिरकर, सुजित धाकतोडे, सिद्धी कवडे, ईश्वर शिंदे आदीनी आपली मनोगत  व्यक्त केले. यावेळी उपस्थित विदयार्थ्यांचा फेटा बांधून शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक  निकम पी.आर, शिक्षक प्रदीप यादव, सज्जन बर्डे, रमेश अंबिरकर, नामदेव झाडे, सुरज राउत, व  शाळेतील विदयार्थ्यानी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर वाघमारे यांनी केले तर आभार यादव यांनी मानले.
 
Top