कळंब -: मंगरुळ (ता. कळंब) येथील शिवसेनेचे धडाडीचे युवक कार्यकर्ते बाळासाहेब उर्फ रविंद्र कांबळे यांनी आपल्या सहका-यासंह खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.
दरम्यान कांबळे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे ऐन निवडणुकीत शिवसेनेला चांगला धक्का बसल्याचे बोलले जाते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भागचंद बागरेचा, सरपंच जयवंत कुंभार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रामहारी रितापूरे, सोसायटीचे अध्यक्ष प्रेमचंद बागरेचा, उपाध्यक्ष रमेश भोसले, मागासवर्गीय विभागाचे उपाध्यक्ष हरिभाऊ कांबळे, संजय गांधी कमिटीचे मधुकर कांबळे, गोविंद घोटकर, समाधान पांचाळ आदी उपस्थित होते.