कळंब -: मंगरुळ (ता. कळंब) येथे आघाडीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांनी जोरदार पदयात्रा काढीत गावातील मतदारांशी थेट संवाद साधला. 
       पदयात्रेत कॉंग्रेस व राष्‍ट्रवादीच्‍या शेकडो कार्यकर्त्‍यांनी सहभाग नोंदविल्‍याने मंगरुळमध्‍ये 'घड्याळा' चा चांगलाच गजर घुमल्‍याचे बोलले जात आहे. मंगरुळ येथील जागृती देवस्‍थान पंचमुखी हनुमान मंदीर व येथीलच दर्गाहमध्‍ये खा. पाटील यांनी रारळ वाढून पदयात्रेत सहभाग घेतला. यावेळी उपस्थितांची बैठक संपन्‍न झााली.
       यावेळी जिल्‍हा बँकेचे संचालक भागचंद बागरेचा, कॉंग्रेसचे नेते त्रिंबक शेळके, अशोक शिंदे, विजेंद्र चव्‍हाण, रामहरी शिंदे, संजय घोगरे, प्रेमचंद बागरेचा, जयवंत कुंभार, उत्‍तम जाधव, रमेश भोसले, शहाजी जाधव, रामहरी रितापुरे, शरद रितापुरे, फिरोज शेख यांच्‍यासह आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्‍येनी उपस्थित होते.
 
Top