![]() |
महेश कार्ले |
जळकोट (संजय रेणुके) :- देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे जोमाने वाहत असून 'व्यक्ती तितक्या प्रवृत्ती' या उक्तीप्रमाणे कोण कोणाचा समर्थक असू शकतो, कोणत्या नेत्यासाठी त्याचा समर्थक वाट्टेल ते नवस सायास करु शकतो. त्याचाच एक भाग असलेला मोदींचा कट्टर समर्थक असलेला महेश नागनाथ कार्ले (रा. जळकोट, ता. तुळजापूर) हा कार्यकर्ता नरेंद्र मोदी हे पंतप्रधान व्हावेत, असा नवस केला आहे.
महेश कार्ले हे तुळजापू तालुक्यातील जळकोट येथील रहिवाशी असून त्यांनी नरेंद्र मोंदी पंतप्रधान व्हावेत म्हणून 'फ्रेंच कट दाढी' वाढवलेली आहे. मोदी पंतप्रधान झाले तरच दाढी काढणार अन्यथा मरेपर्यंत दाढी काढणार नाही, असा नवस कार्ले यांनी केला आहे.
महेश कार्ले हे एक व्यावसायिक आहेत. ते आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाचे प्राथमिक सदस्यही नाहीत. म्हणजेच कोणत्याही पक्षाशी कसलाही दुरान्वयानेही संबंध नाही. असे असले तरी केवळ मोदी हे पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छा असल्याने त्यांनी वरील नवस केला आहे. त्यामुळे कार्ले हे जळकोट व परिसरात नागरिकांमध्ये चर्चेचा विषय झाले आहेत.