![]() |
सुजित धाकतोडे |
कळंब :- (ता. कळंब) येथील श्री संत बोधले महाराज प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील इयता सहावीत शिकणा-या सुजित युवराज धाकतोडे याने एमटीएस स्पर्धा परीक्षेत तालुक्यातून दुसरा तर जिल्हातून सहावा क्रमांक मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. त्याला या परीक्षेसाठी वर्गशिक्षक नामदेव झाडे व रमेश अंबिरकर यांनी मार्गदर्शन केले. त्याच्या या यशाबद्धाल शाळेचे संस्थापक अध्यक्ष सुर्यकांत (बप्पा) टेकाळे, विस्ताराधिकारी संजीव बागल, मुख्याध्यापक निकम पोपट, सहशिक्षक प्रदीप यादव, सज्जन बर्डे, किशोर वाघमारे, सुरज राऊत आदींनी अभिनंदन केले आहे. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.