उस्मानाबाद -: उस्मानाबाद शहरातील शिवाजी चौक, ताजमहल टॉकीजसमोरील बाजार भागातील जागोजागी पडलेल्या कच-याची पाहणी करुन नगर पालिकेचे मुख्याधिकारी अजय चारठाणकर यांना स्वच्छतेबाबत आवश्यक ते निर्देश दिले.
     दि. 22 रोजी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी व न.प.मुख्याधिकारी अजय चारठाणकर यांनी पाहणी करुन नागरिकांनी कचरा रस्त्यावर टाकू नये व जर कोणी रस्त्यावर कचरा टाकला तर त्यांना दंड आकारला जाईल,असे सांगितले. मुख्याधिकारी चारठाणकर यांनी कचरा गाडी रोज सकाळी 9-30 वाजता येथे येईल,असे नागरिकांना सांगितले. या कचरा गाडीत ओला व सुका कचरा वेगळा टाकण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे यांनी सूचना दिल्या. या प्रसंगी नागरिकांकडून याची योग्य ती दखल घेऊत असे या भागातील नागरिकांनी सांगितले.
 
Top