उस्मानाबाद -: गारपीठग्रस्त गुंजेवाडी ता.जि.उस्मानाबाद या ठिकाणी जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी गारपीठीमध्ये शेतक-यांचे नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करुन संबंधितांना शासनाकडून प्रत्येकी 10 किलो गहू व 5 किलो तांदुळ मोफत वाटप करण्यात आले.
    दि. 20 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 4-30 ते 5-30 पर्यंत गुंजेवाडी परिसराला गारांने झोडपून काढले. यावेळी मका, ऊस, भूईमूग, कोबी आदि पिकांचे गाराच्या माऱ्याने अरविंद सांळूके, श्रीरंग हिप्परकर, जीवन हिप्परकर आदि शेतक-च्या पिकाचे नुकसान झाले. यावेळी तहसीलदार सुभाष काकडे, तालुका कृषि अधिकारी श्री. जाधव, रावसाहेब देशमुख यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.
 
Top