उस्मानाबाद -: स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने 21 दिवसाच्या कालावधीचा ड्रेस डिझाईनींग फोर वुमेन या प्रशिक्षणाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचा समारोप जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक, श्रीमती रुपाली सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. यावेळी स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक गवळी यांच्या उपस्थिती होती.
    यावेळी श्रीमती सातपुते यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, अथक परीश्रमाद्वारे आपण जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी प्रशिक्षणाच्या माध्यमातून व्यवसायामध्ये नवचैतन्य निर्माण केले पाहिजे. टेलरिंग व्यवसाय करतांना बदलत्या फॅशनप्रमाणे तुम्हीदेखील बदलून दर्जेदार कपडे निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.
    श्री. गवळी यांनी पुढील  प्रशिक्षण  कॉम्प्युटर- बेसिक विषयक असून ग्रामीण भागातील दारिद्रयरेषेखालील 18 ते 35 वयोगटातील महिलांसाठी 24 एप्रिल ते 25 मे,2014 असे 30 दिवसाचे हे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रवेशासाठी 7875443799 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करुन प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या हुलवणे तर आभार सुस्मिता पांचाळ यांनी मानले.
 
Top