उस्मानाबाद -: महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, उस्मानाबाद यांनी सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींसाठी दि.28 एप्रिल ते 9 मे,2014 या कालावधीत दुग्धविकास, शेळीपालन व कुक्कुटपालन प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे.
    या प्रशिक्षणात दुग्ध विकासाचे महत्व, गायीच्या जाती,चाऱ्यांचे नियोजन, लसीकरण, दुधाचे पॅकिंग, विक्री  तसेच शेळीपालन, उस्मानाबाद शेळीचे महत्व, करडयाची निगा, लसीकरण, आहार व आजाराविषयी माहिती, अर्ध बंदिस्त व बंदिस्त शेडची माहिती, शेळीच्या वेगवेगळया जाती व कुक्कूटपालनात गावरान व बॉयलर याविषयीची माहिती, त्यांच्या खाद्यांची व शेडची माहिती, विमा,आजाराविषयी माहिती तज्ञ व्यक्ती व अधिकारी यांच्याकडून प्रशिक्षणात दिली जाणार आहे.
    उद्योजकीय माहिती यामध्ये संभाषण कौशल्य, व्यक्तीमत्व विकास, प्रकल्प अहवाल, बँक अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, शासकीय कर्ज प्रस्तावाची सविस्तर माहिती, अहिल्याबाई होळकर महामंडळाची माहिती तसेच नाबार्डबाबतही माहिती दिली जाणार आहे.
    तरी ईच्छूक युवक-युवतींनी  अधिक माहितीसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा- जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद कार्यक्रम समन्वयक श्री. राजकुमार गायकवाड भ्रमणध्वनी क्रमांक - 9011219701 यांच्याशी असे आवाहन प्रकल्प अधिकारी एम.सी.ई.डी., द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top