उस्मानाबाद -: रामचंद्र बुबासाहेब कदम रा. शुक्रवार पेठ,तुळजापूर वय -45 हा इसम 5 ते 6 वर्ष झाले घरातून निघुन गेला असल्याची फिर्याद त्याचे वडील बुबासाहेब कदम यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार  रामचंद्र हा उंची 5 फूट 7 इंच, रंग-काळा सावळा, पाठीवर-तीळ, अंगावर-निळसर फिकट शर्ट व काळसर कलरची पॅन्ट अशा वर्णनाचा असून त्याला दारु पिण्याचे व्यसन आहे. सदर इसम कोणास आढळून आल्यास त्यांनी  पोलीस स्टेशन, तुळजापूर (02471-242028) यांच्याशी संपर्क साधावा, असे पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, तुळजापूर यांनी कळविले आहे. 
 
Top