उस्मानाबाद -: महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, उस्मानाबाद यांनी दि. 30 एप्रिल ते 10 मे,2014 याकालावधीत व्याख्याता विकास  प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे.
    या प्रशिक्षणात विविध विषयांतील तज्ञ व्यक्तींना उद्योग व्यवसायाच्या विविध क्षेत्रातील व्याख्याता म्हणून काम करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करुन देणे, गुण व कौशल्य आणि क्षमता विकसीत करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करणे, या व्याख्याता विकास प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर वेगवेगळया प्रशिक्षणामध्ये व्याख्यान देण्यासाठी संधी निर्माण होईल अशी माहिती  प्रशिक्षणात दिली जाणार आहे.
    या प्रशिक्षणासाठी शैक्षणिक पात्रता-पदव्युत्तर, डी.एड,बी.एड.,एम.एड.,एम.फिल, पी.एच.डी.,बी.एस.डब्ल्यु,एम.एस.डब्ल्यु, बी.एस.सी.अॅग्री, एम.एस.सी.अॅग्री,एल.एस.एस., एम.बी.ए., बी.ई., एम.कॉम आहे. तरी ईच्छूकांनी अधिक माहितीसाठी  कार्यक्रम समन्वयक सुमितकुमार सुरवसे भ्रमणध्वनी क्रमांक - 9921771935/9156808879 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी एम.सी.ई.डी., द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद यांनी केले आहे.            
 
Top