उस्मानाबाद :-  राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या वतीने वर्ष 2014-15 मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात विधी साक्षरता  शिबीरे घेण्याकरिता  कार्यरत असणा-या  अशासकीय संस्थेकडून अधीस्वीकृती आणि सहायक अनुदानासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.  संबंधित संस्थांनी तीन प्रतीत आपले प्रस्ताव 30 एप्रिल, 2014 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद यांच्या नावे पाठविण्याचे आवाहन प्रभारी सदस्य सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश पी.बी.मोरे यांनी केले आहे.
        ज्या संस्थांना विधी शिबीरे घेण्याचा अनुभव  असणे गरजेचे आहे.  अशा संस्थेने प्रस्तावासोबत सहायक अनुदान व अधीस्वीकृती  विहित फॉर्म (पूर्णपणे भरलेले), संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, संस्थापना लेख, अधिसंघ नियमावलीची प्रत, मागील तीन वर्षाचा लेखा परीक्षण अहवाल, प्रती शिबीराकरिता होणारा संभाव्य खर्च व अंदाजपत्रक, विधी साक्षरतामध्ये कामाचा  अनुभव असल्याबाबतची कागदपत्रे, 2014-15 मध्ये किती व कोणकोणत्या ठिकाणी शिबीरे घेणार याबाबतची माहिती (किमान 12 शिबीरे) आदी कागदपत्रांसह ही माहिती तीन प्रतीत सदस्य सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधीकरण, उस्मानाबाद यांच्याकडे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
 
Top