पांगरी (गणेश गोडसे) :- तावडी (ता. बार्शी) येथील अमोल शामराव बागल या तरूणाने चित्रपत्र क्षेत्रात पदार्पन केले असुन 'तु फक्त हो म्हण' या ग्रामीण भागातील जीवनावर आधारित चित्रपटात संधी मिळाली आहे. वनराज फिल्म्स निर्मिती कंपनीतर्फे तयार करण्‍यात येत असलेल्या चित्रपटात ग्रामीण भागातील कलाकाराला आपली कला सादर करण्‍याची संधी मिळाली आहे. चित्रपट निर्मिती कंपनीतर्फे नुकत्याच घेण्‍यात आलेल्या निवड चाचणी स्पर्धेत बागल यांची निवड करण्‍यात आली. बागल यांनी निवड समितीसमोर उत्कृष्ठ अभिनय सादर करून चित्रपट क्षेत्रात आपले स्थान निश्‍चीत केले आहे. ग्रामीण भागातुन चित्रपटात काम करण्‍याची संधी बागल यांना उपलब्ध झाल्यामुळे त्यांचे सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे.
 
Top