पांगरी (गणेश गोडसे) -: स्कॉपिओ गाडी खरेदी करण्‍यासाठी माहेरहुन दोन लाख रूपये घेऊन येण्‍याच्या कारणावरून नवविवाहितेचा वारंवार शारीरीक मानसिक छळ करूण तिला गळफास घेऊन आत्महत्या करण्‍यास भाग पाडल्याची घटना बावी (आ) ता.बार्शी येथे घडली असुन पतीसह सासरच्या तिघांविरूदध आत्महत्येस केल्याप्रकरणी पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. तर याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
    पल्लवी गणेश आगलावे (वय 19) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या नवविवाहीतेचे नांव असुन पती गणेश चंद्रकांत आगलावे, सासु मैना चंद्रकांत आगलावे व अनिता प्रमोद काटमोरे सर्व (रा. बावी) अशी विवाहीतेस आत्महत्येस प्रवृत्त केलेप्रकरणी गुन्हा दाखल करण्‍यात आलेल्यांची नांवे आहेत.
   मयत मुलीचे वडील बाबुराव भगवान ननवरे वय 55 (रा. चिखर्डे, ता. बार्शी) यांनी याबाबत पांगरी पोलिसात फिर्याद दिली आहे. ननवरे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, त्यांची मुलगी पल्लवी हिचा विवाह 27 मे 2013 रोजी बावी येथील गणेश चंद्रकांत आगलावे यांच्याबरोबर चिखर्डे येथे विधिवत करून देण्‍यात आला होता. विवाहानंतर एक महिन्यानंतर पल्लवी हिला सासरच्या मंडळीकडुन चारचाकी गाडी घेण्‍यासाठी माहेरहुन दोन लाख रूपये घेऊन येण्‍याच्या कारणावरूण त्रास देण्‍यास सुरूवात केली होती. पल्लवी हिस माहेरहुन पैसै आणण्‍याच्या कारणावरून तिला उपाशीपोटी ठेऊन शिविगाळ करत हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण करत तिचा शारीरीक व मानसिक छळ करून तिला जाचहाट करत गळफास घेऊन आत्महत्या करण्‍यास भाग पाडले असल्याचेही फिर्यादित म्हटले आहे. सततच्या त्रासास कंटाळुन पल्लवी या 19 वर्षीय नवविहितेने सासरी राहत्या घरी आडुला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पांगरी पोलिसात यापुर्वी अकस्मात मयत म्हणुन गुन्हाही नोंद करण्‍यात आला होता. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादिवरून पती सासु व नंनदेविरूध्‍द पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्‍यात आला असुन आरोपींना अटक करण्‍यात आली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राजु राठोड हे करत आहेत.
 
Top