बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- महाराष्‍ट्र सुजल व निर्मल अभियानांतर्गत बार्शी नगरपरिषदेच्‍या योजनेसाठी नागरी पाणीपुरवठा, मलनिःसारण, शौचालय बांधकाम, घनकचरा व्‍यवस्‍थापनासंदर्भात पर्याप्‍त, गुणवत्‍तापूर्ण सेवा, किफायतशीर सेवा शुल्‍कामध्‍ये उपलब्‍ध करुन देणे, विविध तांत्रिक, आर्थिक व व्‍यवस्‍थापकीय सुधारणांच्‍या उद्देशाने महाराष्‍ट्र सुजल व निर्मल अभियान राबविण्‍यात येते. सर्व नागरिकांसाठी पाणीपुरवठा व मलनिःसारणासाठी सर्वव्‍यापक सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी ही योजना राबविण्‍यात येते. राज्‍य शासनाकडून 80 टक्‍के, न.पा. हिस्‍सा 10 टक्‍के व कर्ज 10 टक्‍के अशा प्रमाणात ही योजना कार्यान्वित आहे.
    स्‍थानिक संस्‍थांनी भरलेल्‍या स्‍वहिश्‍याच्‍या प्रमाणात अनुज्ञेय अनुदान वितरीत करण्‍यात येते. बार्शी न.पा.ने स्‍वहिश्‍यापैकी 259 लक्ष इतकी रक्‍कम भरणा केली होती. त्‍या प्रमाणात 1038.12 लक्ष अनुदान वितरित करण्‍याचे राज्‍य शासनाच्‍या विचाराधीन असलेल्‍या योजनेस मंजूरी देण्‍यात आली आहे. बार्शी शहराच्‍या योजनेची एकूण अंदाजे किंमत रु. 5330 लक्ष असून त्‍याप्रमाणात योजनेच्‍या 80 टक्‍के राज्‍य शासनाकडून रु. 4263.67 लक्ष रुपये, नागरी संस्‍थेचे दहा टक्‍के 532 लक्ष, न.पा. कर्ज हिस्‍सा दहा टक्‍के रु. 532 लक्ष अशी योजना असून त्‍यापैकी भरणा करण्‍यात आलेल्‍या स्‍वहिश्‍याच्‍या रक्‍कमेनुसार वितरीत करण्‍यास प्रशासकीय मंजूरी देण्‍यात आली आहे.
 
Top