बार्शी -: आरएसएम समाजसेवा संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य राज्यस्तरीय आरएसएमकेसरीचा मानकरी खुल्या गटातील कोल्हापूरचा माऊली जमदाडे झाला. माऊली जमदाडेने भगवंत मैदानावर हजारो कुस्ती शौकिनांच्या उपस्थितीमध्ये सोलापूरच्या श्रीकृष्ण तालीमचा मल्ल विलास डोईफोडेला नाकपट्टी डावावर चिटपट केले.
      सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख विश्‍वनाथ नेरुरकर,जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील,उत्सव मुर्ती राजेंद्र मिरगणे, माजी जिल्हा प्रमुख अनिल खोचरे,जिल्हा परिषद गटनेते दत्तात्रय साळुंखे,जेष्ठ कुस्तीगीर रावसाहेब मगर,अस्लमकाझी,दादासाहेब पवार,प्रा.संगमेश्‍वर भडुळे, विजय गावडे, महाराष्ट्र चॅम्पीयन आप्पा काशीद,गणेश डमरे,युवासेना जिल्हा उपप्रमुख किरण गायकवाडयांच्या हस्ते माऊली जमदाडेला सव्वाकिलो वजनाची चांदीची गदा व रोख पंच्याहत्तर हजार रुपये व ट्रॉफी देण्यात आली.तर उपविजेता विलास डोईफोडे याला दुसर्‍या क्रमांकाचे अर्धा किलो चांदीचे कडे व रोख रक्कमएक्कावन्न हजार रुपये व चषक देण्यात आला.तर तिसर्‍या क्रमांकाचा मानकरी योगेश बोंबाळेने पाव किलो चांदीचे कडे व ३१ हजार रुपये रोख व चषक पटकावला.४६ किलो वजन गटामध्ये रमेश मुरकुटे,शिर्डी याने ११ हजार रुपये रोख व ट्रॉफी तर दुसरा क्रमांकाचे किशोर भोसले,बार्शी ७ हजार रुपये व ट्रॉफी, दिनेश मुळे,कोल्हापुर,तृतीय क्रमांकाचे बक्षीस ५ हजार रुपये व ट्रॉफी यांनी मिळवले.५६ किलो वजन गटात प्रथमक्रमांक शरद पवार पुणे याला २१ हजार रोख आणि ट्रॉफी तर दुसरा क्रमांक हनुमंत शिंदे,ढवळस,याला ११ हजार व ट्रॉफी , तृतीय क्रमांकाचे बक्षीस बालाजी बुरंगे,सोलापूर,याला ९ हजार रुपये रोख आणि ट्रॉफी देण्यात आली.६६ किलो वजन गटात प्रथमक्रमांक महादेव कुसमूडे,पंढरपुर याला २५ हजार रुपये रोख व ट्रॉफी, द्वितीय क्रमांक अरुण खेंगळे पुणे,याला १५ हजार रुपये रोख आणि ट्रॉफी,तृतीय क्रमांक दादा फराटे,पुणे,याला ११ हजार रुपये रोख आणि ट्रॉफी देण्यात आली.७६ किलो वजन गटात विश्‍वभंर खैरे शिर्डी,याला प्रथमक्रमांकाचे ३१ हजार रुपये रोख व ट्रॉफी,द्वितिय क्रमांकाचे बक्षीस सद्दामजमादार ,लिमेवाडी,याला रुपये २१ हजार व ट्रॉफी मिळवली,तृतीय क्रमांकाचे बक्षीस नितीन भगत ,पुणे याला १५ हजार रुपये रोख आणि ट्रॉफी देण्यात आली.८६ किलो वजन गटात प्रथमक्रमांकाचे किसन कोकाटे,कोल्हापुर,याला रुपये ४१ हजार रोख आणि ट्रॉफी व द्वितिय क्रमांकाचे दत्ता मगर,पुणे,याला ३१ हजार रोख व ट्रॉफी देण्यात आली,तृतीय क्रमांकासाठी सुनील शेवतकर,कोल्हापूर याला २१ हजार रुपये रोख व ट्रॉफी देण्यात आली. फटाक्यांच्या नेत्रदिपक आतीषबाजीमध्ये संयोजकांनी राजेंद्र मिरगणे यांचा शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख विश्‍वनाथ नेरुरकर यांच्या हस्ते भव्य पुष्पहार घालुन व केक कापून जंगी सत्कार केला. कुस्तीला प्रोत्साहन दिल्या बद्दल राजेंद्र मिरगणे यांचा रावसाहेब मगर यांनी मानाचा फेटा बांधुन सत्कार केला. यावेळी प्रास्ताविकामध्ये विलास मिरगणे यांनी स्पर्धा संयोजनाचा हेतू सांगितला.यावेळी शुभेच्छापर मनोगतामध्ये नेरुरकरांनी राजेंद्र मिरगणे यांच्या बरोबर आपले जुने संबंध आहेत त्यांचे कार्य चांगले आहे. त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण व्हावेत असे सांगितले.तर जिल्हा प्रमुख ठोंगे पाटील यांनी बार्शी विधान सभेवर भगवा फडकवा असे अवाहन केले.सत्काराला उत्तर देताना मिरगणे यांनी या अगोदर राज्य स्तरीय कबड्डी स्पर्धा घेतल्या होत्या.युवकांनी निरोगी निकोप शरीर घडवावे. त्यांचा राजकारणासाठी गैरवापर होऊ नये,त्यांच्या शक्तीला योग्य वळण द्यावे यासाठी कुस्ती स्पर्धा आयोजनाला प्रोत्साहन दिले असे सांगितले.यावेळी प्रा.संगमेश्‍वर भडुळे यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी राजेंद्र मिरगणे यांनी स्पर्धेची परंपरा कायमजोपासत पुढच्या वर्षी २ लाख रुपये रोख व २ किलो चांदीची गदा हे पहीले बक्षीस जाहिर केले.यावेळी स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेणारे वस्ताद रामभाऊ बेणे, बिभीषण पाटील,भगत नैयकल सर,प्रा.प्रमोद माळी,बाबासाहेब आवारे,सुत्र संचालक शंकर पुजारी, राजाभाऊ देवकते,अशोक धोत्रे, हलगी वादक राजू आवळे,दिनेश गवळी, बापुसाहेब मोहिते.व्यंकटेश पवार,दिनेश अनपट,राजाभाऊ घोलप,लक्ष्मण पवार जयपाल राऊत,भिमराव घोलप,भाऊ केाळी,विष्णु बांरगुळे,सचिन धस,धंनजय बावणे, यांचा राजेंद्र मिरगणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्पर्धेच्या संयोजनासाठी मदन गव्हाणे,शिरीष घळके,शिवाजी पवार,सुनिल चौगुले, बाळासाहेब पवार डॉ.विलास लाडे,अविनाश शिंदे,धिरज पाटील,संभाजी आगलावे,संतोष काटे,पंडित मिरगणे,प्रदिप बोराडे यांनी परिश्रमघेतले.विनय सारंग यांनी आभार मानले.
 
Top