पांगरी (गणेश गोडसे) :- बार्शी तालुक्यात सोयाबीन ऊत्पादनात होत असलेली वाढ लक्षात घेता सुधारीत तंत्रज्ञान विकसित करून शेतकरी आर्थिकदृष्टया सुदृढ करण्‍याकडे शासनाचा कल असुन होऊ घातलेल्या खरीप हंगामातील सोयाबिन पेरणीसाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे बार्शी तालुक्यातील 138 गावात पन्नास हजार रूपये किंमतीची प्रत्येकी दोन याप्रमाणे सत्तर लाख रूपये किंमतीची सोयाबीन पेरणी यंत्रे अनुदानावर वितरीत करण्‍यात येणार आहेत.
    सर्वसाधारण गटातील लाभार्थांना पंधरा हजार तर मागासवर्गीय लाभार्थांना 4500 रूपये कृषी खात्याकडे जमा करावे लागणार आहेत तर उर्वरीत रक्कम ही कृषी खात्यातर्फे दिली जाणार आहे. बाजारपेठेत नामांकित कंपन्यांचे सोयाबिन बियाणे उपलब्ध नसल्यामुळे शेतक-यांनी धान्य म्हणुन घरी शिल्लक ठेवलेले सोयाबिन रोगप्रतिकारक औषधे लावुन पेरणीसाठी वापरूण पैशाची बचत करूण ते पैसै रासायनिक खातासाठी वापरावे, असे आवाहन पांगरीचे कृषी सहाय्यक राजाभाऊ देशमुख यांनी एका लेखी प्रसिदधीपत्रकाद्वारे केले आहे.
    मंडल अधिकारी कार्यालयातर्फे प्रसिध्‍द करण्‍यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जुन्या पारंपारिक शेती व पीक पध्‍दतीत शेतक-यांनी बदल करून आधुनिक शेतीची कास धरणे गरजेचे होत असुन सोयाबीन उत्पादक शेतक-यांनी यावर्षीपासुन पेरणी पध्‍दतीत बदल करून शासनमान्य बि.बि.एफ.पध्‍दतीच्या यंत्रचलित व बैलावर चालणा-या यंत्राद्वारे वाफा व रूंद सरी पध्‍दतीने पेरणी करावी, त्यामुळे खर्चात मोठी कपात होऊन ऊत्पादनातही मोठी वाढ होण्‍यास मदत होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या अभियांत्रिकी विभागातील तज्ञ शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या या पेरणी यंत्राद्वारे एकाच वेळेस पेरणी, खत, कुळवणी, वाफे व सरी पाडणे अशा सर्वच कामगती एकाच वेळेत पुर्ण होणार असुन पेरणीपासुनच शेतक-यांच्या खर्चात मोठी बचत होण्‍यास मदत होणार आहे. तसेच या यंत्राद्वारे वाफा व सरी तयार होणार आहेत. त्यामुळे कमी पाऊस पडला तर पडलेले पाणी पिकास मिळणार आहे तर जास्त पाऊस झाल्यास सरीने पिकाबाहेर पडण्‍यास मदत होणार आहे.
   तरी शेतक-यांनी कंपन्यांच्या बियाणांच्या मागे न लागत घरगुतीच बियाणे पेरणीसाठी वापरून सुरूवातीपासुनच खर्चात बचत करून जास्तीत जास्त पैसै शिल्लक राहतील, असे नियोजन करावे असे अवाहनही पांगरीचे मंडल कृषी अधिकारी नकाते यांनी केले आहे.
 
Top