वैराग (महेश पन्‍हाळे) -: सुमारे चाळीस लाख रुपये खर्चून नव्याने बांधण्यात आलेले वैराग (ता. बार्शी) येथील दुय्यम निबंधक श्रेणी १ कार्यालय तब्बल एका वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असून संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे खरेदी – विक्री व्यवहार करण्यासाठी येणा-या नागरिकांना नाहक त्रास सहन करवा लागत असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून लवकरात लवकर या नवीन इमारतीत स्थलांतर करावे अशी मागणी होत आहे .
   याबाबत माहिती अशी कि, बार्शी तालुक्‍यातील वैरागसह आसपासच्या ६१ गावातील खरेदी – विक्री – गहाणखत आदी कायदेशीर व्यवहार करण्यासाठी वैराग येथे स्वातंत्र्या पूर्वी म्हणजे १९०५ च्या सुमारास सुरु करण्यात आले आहे. हे कार्यालय सध्या ग्रामपंचायतच्या जागेत सुरु आहे. याठिकाणी वैराग, मालवंडी, सुर्डी, इरले, शेळगाव, गौडगाव, उपळे, जवळगाव आदी वैराग भागातील प्रमुख गावासह सुमारे ६१ गावांतील जमीन – जागा खरेदी विक्री सह विविध व्यवहारातील गहाणखत व्यवहार होतात .ज्याठिकाणी सध्या कार्यालयाची इमारत आहे ती  इमारत जीर्ण झाली असून पावसाळ्यात पावसाचे पाणी जीरपून आत येते. त्यामुळे कार्यालयातील महत्वाची कागदपत्रे भिजून नष्ट होण्याचा थोका निर्माण झाला म्हणून सोलापूर रोड लगत छत्रपती संभाजी महाराज चौकात सुमारे चाळीस लाख रुपये खर्चून दुय्यम निंबधक श्रेणी १ कार्यालय बांधण्यात आले आहे. शासनाचे लाखो रुपये या बाधकामावर खर्च झाले आहेत. सध्या ज्याठिकाणी कार्यालय आहे ती जागा अपुरी असून प्रशस्त इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून सुध्दा नवीन इमारतीत कार्यालय सुरु करण्यात आलेले नाही. एकीकडे शासकीय कार्यालयांना इमारतीच नाहीत .याठिकाणी इमारत व बांधकाम पूर्ण असताना वापर नाही अशी अवस्था झाली आहे.
      सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेली सदर इमारत सोलापूर जिल्ह्यात प्रशासनाच्या दृष्टीने एकमेव असून वैराग येथे बांधण्यात आलेल्या इमारती सारखी दुसरी इमारत संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात नाही. असे असताना केवळ प्रमुख पाहुणा मिळत नाही म्हणून तब्बल वर्षा पासून नवीन इमारत उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे .तरी लवकरात लवकर या नवीन इमारतीचे उद्घाटन करून दुय्यम निबंधक कार्यालय छत्रपती संभाजी चौकात सुरु करावे अशी मागणी होत आहे. 
 
Top