कळंब -: मौजे पिंपळगाव (डो.) ता. कळंब येथे माजी ग्रामपंचायत सदस्‍य देविदास घोडके यांच्‍या अध्‍यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब अांबेडकरांच्‍या 123 व्‍या जयंतीनिमित्‍त येथील मागासवर्गीय आणि आ‍र्थिक विंवचनेत असलेल्‍या निराधार महिला श्रीमती सुबाबाई ओव्‍हाळ, रुक्मिणीबाई कांबळे, गंगुबाई कांबळे, लिंबाबाई कांबळे, गयाबाई कसबे या महिलांना आर्थिक मदत मान्‍यवरांच्‍या हस्‍ते देण्‍यात आले. 
       पत्रकार अविनाश घोडके यांचा मागील वर्षी अपघात झाला होता.  तो वीस दिवस कोमात राहून त्‍यांच्‍या मेंदूवरील शस्‍त्रक्रिया यशस्‍वी झाली. या घटनेस आज वर्ष पूर्ण होत असून तो पूर्ववत सर्व काम करत असल्‍याने त्‍यास प्रोत्‍साहन मिळावे, म्‍हणून ग्रामपंचायतीच्‍यावतीने उपसरपंच शाहूराज कळसे यांच्‍या हस्‍ते शाल, फेटा, नारळ देऊन सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या सुरुवातीस बुध्‍दपुजा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ज्‍योतीबा फुले यांच्‍या प्रतिमेस प्रा.डॉ. संजय कांबळे, उत्‍तम टेकाळे, त्रिवेणी कसबे, महमंद चाऊस, प्रकाश भंडगे यांच्‍या हस्‍ते पुष्‍पहार अर्पण करण्‍यात आला. सरपंच लिंबराज आबा टेकाळे यांच्‍या हस्‍ते निळ्या ध्‍वजाचे ध्‍वजारोहण करण्‍यात आले. या कार्यक्रमात त्रिवेणी कसबे, प्रा.डॉ. संजय कांबळे, प्रकाश भडंगे, माधव सिंग राजपूत, प्रतिक गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेबांचे विचार सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अविनाश घोडके यांनी केले. तर आभार गोविंद घोटकर यांनी मानले.
 
Top