उस्मानाबाद -: महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 54 वा वर्धापनदिन आज जिल्हृयात सर्वत्र उत्साहाने साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. येथील पोलीस संचलन मैदानावर पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले.
    प्रारंभी पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण होताच पोलीस दलाने राष्ट्रध्वजास राष्ट्रीय सलामी दिली. त्यानंतर पोलीस दल, गृहरक्षक दलाच्या संचलनाची मानवंदना श्री. चव्हाण यांनी स्वीकारली. सहायक पोलीस अधीक्षक एस. कलासागर यांनी संचलनाचे नेतृत्व केले.
विविध विभागांचे चित्ररथही यावेळी सहभागी झाले होते. समारंभाला उपस्थित असणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व नागरीकांची भेट घेवून पालकमंत्री चव्हाण यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
               या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष वट्टे, उपाध्यक्ष संजय पाटील दुधगांवकर तसेच विविध समित्यांचे सभापती यांच्यासह विविध मान्यवर, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी  सुमन रावत, गृहरक्षक दलाचे समादेशक तथा अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.    
     अपर पोलीस अधीक्षक भांगे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्राप्त झाल्याबद्दल यावेळी  पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. याशिवाय एन.के. मंडाळे यांना आदर्श तलाठी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हणमंत पडवळ यांनी केले. 
 
Top