उस्‍मानाबाद -: जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, मान्यवर व्यक्ती, निवासी जिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी प्रशांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी सर्वश्री शिल्पा करमरकर, राम मिराशे, बी. एस. चाकुरकर, प्रभोदय मुळे, श्रीरंग तांबे, अरविंद लाटकर, जिल्हा नियोजन अधिकारी एम. के. भांगे, तहसीलदार सुभाष काकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.
    जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी हुतात्मा स्मृतीस्तंभासही पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.
अपर जिल्हाधिकारी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण
येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात अतिरिक्त जिल्हाधिकारी जे. टी. पाटील  यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत असणाऱ्या विविध कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top