पांगरी (गणेश गोडसे) :- पावसाळयाला एक महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना पांगरी (ता. बार्शी) या डोंगरी पटयातील शेतकरी एका वेगळयाच चिंचेने ग्रासला आहे. सध्या नियमितपणेच या भागात अवकाळी पावसाची हजेरी सुरू असुन त्यामुळे तापमानात चढ उतार होत असुन या तापमानाचा परिणाम आगामी येऊ घातलेल्या पावसाळयावर होणार का? या एकाच भ्रांतेत या भागातील बळीराजासह सर्वसामान्य नागरीक सापडलेले असुन तसे झाल्यास यावर्षीच अनेक अडचणींचा सामना करत असलेल्या शेतक-यांसमोर पुढील वर्षी काय करायचे असा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. सध्या जरी तपमानातील चढ-उताराच्या वातावरणाने व यापुर्वीच्या अशा प्रकारच्या वतावरणाच्या परिणामामुळे पाऊस न पडल्याचे दाखले समोर असल्यामुळे या भागात भितीयुक्त वातावरण निर्माण झाले असुन प्रत्येकजण पुढे काय होईल याबाबत दबक्या आवाजात चर्चा करत आहेत.
पांगरी या डोंगरी भागात यावर्षीचा उन्हाळा म्हणावा असा जाणवलेला नाही. या पटयात दोन-चार दिवसांच्या विश्रांतीनंतर थोडयाफार प्रमाणात का होईना अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे पुन्हा कांही दिवस त्या पडलेल्या पावसावर पुढे सरकतात. यावर्षी या भागात कधी नव्हे असा गारपीठ व अवकाळी पावसाचा अनुभव अनुभवास आला असुन मार्च महिन्यात उक्कडगांव पांगरी परिसरात पडलेली गारपीठ तर नुकतीच काही दिवसांपुर्वी गुंजेवाडी कारी आदी परिसरात गारपीठ होऊन शेतक-यांचे उध्वस्त झालेले संसार हया गोष्ठी कशाची चाहुल देतात हा मोठा प्रश्न येथील सर्वसामान्यांना पडला आहे. अवकाळी पाऊस व गारपीठीसारख्या अस्मानी संकटामुळे या भागातील अनेक शेतकरी मुकी जनावरे ही विजेच्या भक्षस्थानी पडुन मृत्युमुखी पडली आहेत. अनेक शेतक-यांची कुटुंबे व स्वप्ने उध्वस्त झाली असुन त्यांना उभारी घेण्यासाठी पुन्हा नव्या जेमाने कामाला लागावे लागणार आहे. अनेक शेतक-यांना विजेच्या झटक्यांची हाणी पोहचली असली तरीही ते आजुनही शासनाच्या तात्काळ मिळणा-या मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. शासन त्यांना तातडीची मदत केव्हा देणार? असा प्रश्नही संबंधीत मृतांच्या नातेवाईकांमधुन विचारला जात आहे. नैसर्गिक आपत्तीत मृत्यु झाल्यास शासनाकडुन तातडीची मदत म्हणुन मृतांच्या नातेवाईकांना ठराविक रक्कम दिली जाते.
कडक उन्हाळयात जर पाऊस पडुन तापमान खाली आले तर पावसाळयात वरूणराजा रूसल्यासारखे करून शेतक-यांची परीक्षा पाहतो व सामान्यांचा जीव मेटाकुटीला आणतोच असा या भागातील जुन्या जानत्या बुजुर्गांचा अनुभव आहे. सध्या जुन्या पिठीतील लोक यावर्षी पावसाळयात पावसाची शक्यता नसल्याबाबत उघडपणे बोलु लागले आहेत. शास्त्रीय दृष्टया विचार केल्यास शेतकरी बोलतात हे कांही चुकीचे नसल्याचीही चर्चा होत आहे. पुर्वी कोणतीच हवामानविषयक व्यवस्था नव्हती तेव्हा शेतकरी वा-याची दिशा व एकंदर परिस्थतीवरूण अंदाज घेऊन दैनंदिन कार्यक्रम पार पाडत होते.