पांगरी (गणेश गोडसे) :- कधी काळी संपुर्ण महाराष्ट्रात नावाजलेले शस्त्रक्रियांसह इतर चांगल्या कामांमध्ये अग्रस्थानी राहिलेल्या पांगरी (ता. बार्शी) येथील ग्रामिण रूग्णालयातील डॉक्टरांचा मनमानी कारभार सुरू असुन हे रूग्णालय विविध समस्यांच्या विळख्यात सापडले असुन संबंधित वरिष्ठ अधिका-यांनी याकडे तात्काळ लक्ष केंद्रित करून रूग्णालयास अचानक भेट देऊन पाहणी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे जिल्हा संघटक सचिव व विभागीय आप्तकालीन अध्यक्ष रंगनाथ जानराव यांनी एका लेखी निवेदनाद्वारे महाराष्ट्राचे आरोग्य संचालकांना दिला आहे.
पांगरी येथे परिसरातील गावांमधील रूग्णांच्या आरोग्यसेवेसाठी अनेक वर्षांपुर्वी दहा एकर क्षेत्रात सुसज्ज अशा ग्रामिण रूग्णालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे एका वैद्यकीय अधिक्षकासह दोन वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या मदतीला अनेक कर्मचारीही नियुक्त करण्यात आलेले आहेत. नुकतेच शासनाच्या आरोग्य विभागात 70 लाख रूपयांचा निधी रूग्णालयात अत्याधुनिक सुविधांची उपलब्धताही करून देण्यात आलेली आहे. मात्र याचा रूग्णांना लाभ होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. पांगरी हे गाव उस्मानाबाद व सोलापुर जिल्हयाच्या सरहदीवरील असल्यामुळे येथे शेजारील जिल्हयातील अनेक गांवामधुन रूग्णांची ये-जा असते. पुर्वी नावारूपाला असलेल्या या रूग्णालयाला अवकळा आली असुन याकडे लक्ष देण्यास कोणालाही वेळ नसल्याचे सर्वसामान्य रूग्णांमधुन बोलले जात आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य खात्यास दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, पांगरी येथील ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी हे रूग्णालयात वेळेवर उपस्थित राहत नाहीत. कधीकाळी संपुर्ण दिवसभर सुरू राहणारी ओपीडी ही फक्त सकाळी 10 ते 12 हया दोन तासांच्या वेळेतच उरकुन दुपारनंरची ओपीडी ही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे दुपारनंतर येणा-या रूग्णांना आरोग्यसेवा उपलब्ध होत नाही. त्यांना उपचारासाठी दुस-या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत वाट पहावी लागते. सुटी नसताना व रजा न काढता वैद्यकीय अधिकारी त्यांच्या सोईने गावाला निघुन जातात. तसेच ओपीडी बोगस दाखवुन त्यांना रात्री रूग्णालयात उपचारासाठी थांबण्याचे टाळण्यासाठी आलेल्या रूग्णांनांसह किरकोळ रूग्णांनाही पुढील उपचारासाठी दुस-या रूग्णालयात पाठवुन आपली जबाबदारी वैद्यकीय अधिकारी झटकतात असेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे. रूग्णालयातील अधिका-यांचा मनमानी कारभार संपवुन गरजु रूग्णांना उपचार उपलब्ध होण्यासाठी ग्रामीण रूग्णालयातील ओपीडी पुर्वीप्रमाणेच सुरू करावी व वरिष्ठांनी अचानक भेट देऊन पाहणी करून योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.